कर्जाचा बोजा असह्य झाल्याने एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील यरनाळ गावात घडली.


होय, कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टीने, कधी सरकारच्या अवकृपेमुळे तर कधी नफेखोर व्यापारी किंवा दलालांमुळे कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्याला कर्जाचे ग्रहण लागले आहे. अशाच दुष्टचक्रात अडकलेल्या यरनाळ गावच्या ३८ वर्षीय सिकंदर दस्तगीर सनदी या शेतकऱ्याने विष पिऊन मृत्यूला कवटाळले. आपल्या १७ गुंठे शेतात तो भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन कुटुंब चालवीत होता. मात्र गेली २ वर्षे कोरोना संकटामुळे त्याच्या उत्पादनांना चांगला भाव मिळत नसल्याने त्याने कर्ज काढले होते. स्थानिक सहकारी आणि खासगी संस्थांकडून घेतलेले कर्ज न फेडता आल्याने तो तणावाखाली होता. गेल्या आठवड्यापासून तो मद्याच्या नशेत, ‘माझे कर्ज वाढले आहे, मी आत्महत्या करणार आहे’ असे सांगत फिरत होता. आज, शुक्रवारी सकाळी त्याने घरातील कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पीएसआय बी. व्ही. न्यामगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरु आहे. फ्लो


Recent Comments