भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटल्याची घटना पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील सुतगट्टी घाटात शुक्रवारी सकाळी १०,३० च्या सुमारास घडली. सुदैवानेच या अपघातात प्राणहानी टळली.


होय, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील सुतगट्टी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०,३० च्या सुमारास घडली. अपघातानंतर कार महामार्गाच्या बाजूला जाऊन पडली. या कारमधून लहान मुलांसह एकूण ५जण प्रवास करत होते. मात्र सुदैवानेच प्राणहानी झाली नाही. केवळ किरकोळ जखमांवर निभावले आहे. दुर्घटना घडताच स्थानिक नागरिकांनी लागलीच धाव घेऊन कारमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या प्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments