येत्या २१ नोव्हेंबर रोजी वड्डर समाजाचा वधुवर मेळावा बेळगाव मधील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वड्डर समाजाचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट सुरेंद्र उगारे यांनी दिली.

चिकोडी गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अत्यंत मागासवर्गीय असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यात प्रथमच वड्डर समाजाचा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला असून कित्तूर कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील समाजबांधवांनी या मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून वड्डर समाजातील विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली सदर मेळावा आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या मेळाव्यास भोवी गुरुपीठाचे इम्मडी सिद्धरामेश्वर महास्वामी यांचे नेतृत्व लाभणार आहे. या मेळाव्यास २०० हुन अधीक वधू वर सहभागी होण्याची शक्यता असून राजकारण्यांना या मेळाव्यास निमंत्रित करण्यात आले नाही. भोवी समाजाचे संघटन करण्याच्या हेतूने सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ऍडव्होकेट सुरेंद्र उगारे यांनी दिली.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ९४८०४३८००८, ९८४५७३०६१२, ७३५३१५२४२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला अनिल ममदापुरे, वसंत पवार, श्रीशैल वडेयर, सिद्राम बंडीवड्डर, हणमंत वड्डर आदी उपस्थित होते.


Recent Comments