बेळगावातील माळमारुती पोलिसांनी एकाच दिवशी २ जुगारी अड्ड्यांवर छापे टाकून १७ जुगाऱ्यांना अटक केली.

होय, मिळालेल्या निश्चित माहितीवरुन माळमारुती पोलिसांनी एकाच दिवशी २ जुगारी अड्ड्यांवर छापे टाकून १७ जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या. ऑटोनगरजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगारी अड्डा भरविण्यात आल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी तेथे छापा टाकला. या छाप्यात तब्बल ८०,९५० रुपये जप्त करून १४ जुगाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत कणबर्गीजवळ भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ३ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जुगारात लावलेले ११,६५० रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाईत मिळून एकूण १७ जणांना अटक करून ९२,६०० रुपये जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकरणी गुन्हा नोंदवून माळमारुती पोलिसांनी आरोपीना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Recent Comments