Belagavi

विविध प्रकरणात जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट

Share

बेळगाव जिल्ह्यातील विविध ठाण्यांमधील दाखल विविध प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांची जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटीतर्फे बुधवारी विल्हेवाट लावण्यात आली.

अमली पदार्थांशी संबंधित बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या २८ प्रकरणात ८ लाख ४८,७९२ रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. ३३५.५१६ किलो वजनाचे हे अमली पदार्थ न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमतीने आज नष्ट करण्यात आले.

मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प येथील द बेलगाम ग्रीन एन्विरोनमेंटल प्रा. लि. च्या कार्यस्थळावर नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Tags: