नंजुडप्पा अहवाल हा उत्तर कर्नाटकासाठी बायबलप्रमाणे आहे. यामुळे सदर अहवालाची अंमलबजावणी पूर्णपणे होणे गरजेचे आहे, असा आग्रह के एल इ कार्याध्यक्ष आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी केलाय.

बेळगावमधील कन्नड भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी नंजुडप्पा अहवाल महत्वाचा असून सदर अहवालात उत्तर कर्नाटकाच्या विकासासंदर्भात संपूर्ण नोंदी करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. रस्ते, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, पशुचिकित्सालय यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे. यामुळे संबंधितांनी सदर अहवालाच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी पाऊले उचलून उत्तर कर्नाटकाचा विकास करावा, असा आग्रह केला.
यावेळी काँग्रेस नेत्यांवर होत असलेल्या बिट कॉईन संदर्भातील आरोपांवर देखील त्यांनी प्रतिक्रया दिली असून बिटकॉइन हे मटका असल्याचे म्हटले आहे. यामध्ये जनता सहभागी आहे. परंतु राजकारण्यांचा सहभाग नाही असे आपण म्हणू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली.
यानंतर ते म्हणाले कि, बिटकॉइन संदर्भात मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना डॉ. कोरे म्हणाले, असे काही नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई कर्नाटकचे कित्तूर कर्नाटक, कृष्ण योजनेसाठी निधी वाटप, दोन वर्षानंतर बेळगावमध्ये होणारे अधिवेशन, आमदार भवन, मंत्रिभवन यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. यासाठी मीही सरकारला आणि सभापतींना पत्र लिहिले असल्याचे ते म्हणाले.
यानंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उर्वरित पक्ष काय करणार आहेत, याची माहिती आपल्याला नसून मी कोणत्याही कारणास्तव निवडणूक लढविणार नसल्याचे डॉ. कोरेंनी स्पष्ट केले. माझे मित्र महांतेश कवटगीमठ यांच्यासाठी मी प्रयत्नशील असून कदाचित त्यांनाच पक्षातून उमेदवारी देण्यात येणार आहे, असेही डॉ. कोरे म्हणाले.


Recent Comments