गेल्या वर्षी २०२१मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले.
गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य सौहार्द सहकार फेडरेशनचे संचालक लक्ष्मण पवार, नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश चौलगार उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील दक्षिण विभागातून बाळकृष्ण काटकर याना प्रथम, अखिलेश कोकितकर याना द्वितीय, सागर हुंदरे याना तृतीय, श्रुती भोसले याना चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. उत्तर विभागातून वैभव बडमंजी याना प्रथम, अमोल पुजारी याना द्वितीय, अथर्व जाधव याना तृतीय, हरीश घोरपडे याना चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. बेळगाव ग्रामीण विभागातून अक्षय बाळेकुंद्री याना प्रथम, विनोद मेणसे याना द्वितीय, पूनम रेडेकर याना तृतीय, मारुती डोणकरी याना चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.



Recent Comments