Nippani

कित्तूर कर्नाटक नामांतर : निपाणी शहरात साजरा झाला विजयोत्सव

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मुंबई कर्नाटकचे नामांतर कित्तूर कर्नाटक असे करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरात कित्तूर राणी चन्नम्मा चौकात विजयोत्सव साजरा करण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी निपाणी शहरातील राणी चन्नम्मा चौकात विविध कन्नड संघटनांच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी चिंचणी येथील श्री अल्लमप्रभू महास्वामी उपस्थित होते. विजयोत्सवादरम्यान ते बोलताना म्हणाले कि, या दिवसाची आपण अनेक दिवसांपासून वाट पाहात होतो. अनेक दिवसांच्या मागणीनंतर कित्तूर उत्सवादरम्यान दिलेला शब्द मंत्रिमंडळ बैठकीत पाळण्यात आला असून मुंबई कर्नाटकचे नामांतर कित्तूर कर्नाटक असे करण्यात आले आहे. जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत असून मुख्यमंत्र्यांसोबत शशिकला जोल्ले यांचेही आपण आभार मनात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी निपाणी समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामी, कन्नड परिषदेचे निपाणी विभागाचे कार्यदर्शी मिथुन अंकली, पुराणिकमठ मारुती कोण्णूरी, निपाणी नगराध्यक्ष जयवंत बाटले, उपाध्यक्ष निताबागडे, पालिका आयुक्त हुलगेज्जी, उपतहसीलदार बोंगाळे, तसेच भाजपचे नगरसभेचे सदस्य आणि कन्नड संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Tags: