Khanapur

कांजळे (ता. खानापूर) येथे बैलगाडीची जंगी शर्यत

Share

खानापूर तालुक्यातील कांजळे गावात बैलगाडीची जंगी शर्यत घेण्यात आली. खानापूरच्या . डॉ. अंजली निंबाळकर यांनी या शर्यतीचे उदघाटन केले

होय, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली सुमारे २ वर्षे जाहीर सभा, कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. ग्रामीण भागात तर बैलगाड्यांची शर्यत म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांना एक मोठा विरंगुळा ठरतो. त्यामुळे खानापूर तालुक्यातील कांजळे गावात बैलगाडीची जंगी शर्यत आयोजित केली होती. त्यावेळी बैलगाडीचे पूजन करून स्वतः बैलगाडी हाकून आ. अंजली निंबाळकर यांनी या शर्यतीचे उदघाटन केले. त्यांच्या या अनोख्या शैलीने उपस्थितांचा आणि आयोजकांचाही उत्साह वाढविला. यावेळी खानापूर तालुक्यातील विविध गावचे शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: