हुक्केरी येथे मंगळवारी कायदा सेवा दिन पाळण्यात आला.

हुक्केरी न्यायालय आवारातील डिजिटल ग्रंथालयाच्या सभागृहात मंगळवारी कायदा सेवा दिन पाळण्यात आला. ज्येष्ठ न्या. के. एस. रोट्टेर यांनी रोपण पाणी घालून त्याचे उदघाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्वसामान्यांत कायद्याविषयी जागृती निर्माण करून मोफत कायदा सेवा व सल्ला देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार हुक्केरी तालुक्यातील विविध गावांत ४५ कायदा साक्षरता कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये कायद्याविषयी जागृती करण्यात आली आहे. याप्रसंगी हुक्केरी वकील संघाचे अध्यक्ष डी. के. अवरगोळ, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, तापं मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, बीईओ मोहन दंडीन, सीडीपीओ मंजुनाथ परसन्नवर, व्ही. आर. नागनूर, पीएसआय सिद्रामप्पा, ज्येष्ठ वकील एच. एल. पाटील, टी. एस. सोड्डान्नावर, के. बी. कुरबेट बी. एम. जिनराळे आदी उपस्थित होते. कनिष्ठ न्यायाधीश के. अंबण्णा म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून न्यायालये अथवा शासकीय कचेऱ्यातील प्रलंबित खटल्यांची संख्या सामंजस्याने निकाली काढून कमी करणे हाच कायदा सेवा समितीचा उद्देश आहे. यावेळी वकील, शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments