Belagavi

विधान परिषद निवडणूक १० डिसेंबरला !

Share

बेळगाव जिल्ह्यातील २ मिळून राज्यातील एकूण २५ विधान परिषद मतदार संघातील निवडणुकीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. त्यामुळे डिसेंबरमध्ये बेळगावातील सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्या २५ वि. प. सदस्यांना भाग घेता येणार नाही.

होय, कर्नाटक विधान परिषदेतील २५ सदस्यांचा कार्यकाळ या, नोव्हेंबरअखेरीस संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या आतच बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याची मागणी विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सरकारकडे केली होती. मात्र सरकारने १३ ते २४ डिसेंबर या काळात अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशातच आज निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने या २५ सदस्यांची अधिवेशनात भाग घेण्याची संधी हुकल्यात जमा आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या २० स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातून २५ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १० डिसेंबर रोजी मतदान घेण्याचे निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, १६ नोव्हेंबरला आयोग निवडणुकीची अधिसूचना जारी करेल. २३ नोव्हेंबर अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. २६ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. १० डिसेंबरला मतदान तर १४ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. १४ डिसेंबरला निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी १५ डिसेंबरलाच होण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर त्यांना अधिवेशनात भाग घेता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. फ्लो

 

Tags: