लोकप्रिय कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाला आज १२ दिवस पूर्ण झाल्यानिमित्त बेळगावातील शहापूर दाणे गल्लीतील भाजीमार्केट्मध्ये मंगळवारी पुनीत याना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शहापूर दाणे गल्लीतील भाजीमार्केट्मध्ये मंगळवारी चाहत्यांना अन्नदान करून श्रद्धांजली वाहण्यात आली. वीर मदकरी गर्जना संघाने हा उपक्रम राबविला. 
याबाबत वीर मदकरी गर्जना संघाचे राज्याध्यक्ष आनंद शिरूर म्हणाले, पुनीत राजकुमार यांनी कोणताही गाजावाजा न करता मोठी समाजसेवा केली. एक गुणी अभिनेता आणि तळमळीचा समाजसेवक म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष विकास शिरूर, सरचिटणीस आकाश करोशी, रमेश सोनटक्की, अंजली पाटील, अजय तिळवे, उमेश होसूर, विनायक भस्मे आदी उपस्थित होते.


Recent Comments