Vijayapura

अक्कमहादेवी विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ पार

Share

राज्यातील एकमेव महिला विद्यापीठ म्हणून परिचित असलेल्या अक्कमहादेवी महिला विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल थावरचंद गेहलोत हे होते.

अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विविध विषयात प्राविण्य मिळविलेल्या 76 विद्यार्थिनींना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. तर 48 विद्यार्थिनींना पीएचडी प्रदान करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या तीन मान्यवर महिलांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.

13 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या विद्यापीठात लाखो विद्यार्थिनींनी शिक्षण पूर्ण केले आहे. या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रथमच राज्यपालांनी उपस्थिती लावली होती.

या समारंभात राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या जानकी श्रीनिवासमूर्ती, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या डॉ. सुमा सुधींद्र, आणि समाजसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या डॉ. कल्पना सरोजा यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करन्यात आले. या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सुधा मूर्ती यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.या महिला विद्यापीठात एकूण 22 विविध अभ्यासक्रम असून यामधील 76 विद्यार्थिनींचा सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. टॉप 3 विद्यार्थिनींना राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थीनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

विविध विभागातील विद्यार्थिनींनी कोरोना काळातदेखील उत्तम अभ्यास करून यश मिळविल्याने उपस्थितांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. या समारंभाला विद्यापीठाचे प्राध्यापाक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: