उसाच्या फडातील वीज खांबावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने १० एकरातील उसाचा फड जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना विजापूर जिल्ह्यात मंगळवारी घडली.

होय, विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बैलकूर गावातील गुरुबसाप्पा निलाप्पा पंपन्नावर या शेतकऱ्याच्या उसाच्या फडाला आग लागली. शेतात उभारलेल्या वीज खांबावर शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागली आणि पाहता-पाहता १० एकरातील संपूर्ण फड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे पंपन्नावर या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 


Recent Comments