Belagavi

कौजलगी पेट्रोल पंपाच्या मालकाने केले अतिक्रमण

Share

 बेळगावातील शिवाजीनगरातील कसबेकरमेटगुड क्लिनिक रस्त्यावर असलेल्या कौजलगी पेट्रोल पंपाच्या मालकाने अतिक्रमण केल्याचा आरोप शिवाजीनगरातील नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविल्यास नागरिकच ते हटवतील असा इशारा देण्यात आला आहे.

बेळगावातील शिवाजीनगरातील कसबेकर-मेटगुड क्लिनिक रस्त्यावर माजी मंत्री व्ही. एस. कौजलगी यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे. १२० फुटी रस्त्यावर अतिक्रमण करून हा पेट्रोल पंप उभारल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सध्या स्मार्टसिटी प्रकल्पाची कामे सुरु आहेत. त्यामुळे मालकाने अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. फ्लो यासंदर्भात एका नागरिकाने, पेट्रोल पंप मालकाने अतिक्रमण केले तेंव्हा महानगरपालिका, बुडा आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी काय करत होते? असा सवाल केला. पंप मालक ही जागा आपली असल्याचा दावा करत आहे. परंतु ती बेळगाव मनपाची आहे. त्यामुळे अतिक्रण हटविण्याऐवजी पालिका अधिकारी गप्प का आहेत? असा संताप व्यक्त केला.

आणखी एका नागरिकाने सांगितले की, सध्या स्मार्टसिटी प्रकल्पाची कामे सुरु आहेत. त्यामुळे मालकाने अतिक्रमण हटवावे यासाठी २ दिवसांची मुदत दिली आहे. जर त्या अवधीत अतिक्रमण हटवले नाही तर शिवाजीनगरातील नागरिकांतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. बाईट

सध्या बेळगाव शहरात स्मार्टसिटी प्रकल्पाची कामे जोरात सुरु आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून कामांना अनुकूल करून दिले पाहिजे. पालिका अधिकारी आता यावर काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.

 

 

 

Tags: