गेल्या २ वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडून दुरुस्तीअभावी राहिलेला गोलघुमट मार्ग रस्ता एका रात्रीत दुरुस्त अन चकाचक झाल्याचा चमत्कार विजापुरात घडला आहे. राज्यपालांच्या विजापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा चमत्कार घडला आहे.

होय, राज्यपाल थावरचंद गेहलोत जगप्रसिद्ध गोलघुमट आणि बाराकमान पाहण्यासाठी आज सायंकाळी ४.२५च्या सुमारास विजापूरला भेट देणार आहेत. त्यामुळे ते ज्या मार्गावरून जाणार आहेत ते सर्व रस्ते एका रात्रीत दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात आले आहेत. गेल्या २ वर्षांपासून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गोलघुमट मार्गावरून जाणे जिकिरीचे बनले होते. या मार्गावर अनेकजण अपघातात पडून जखमी झाले होते. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक वेळोवेळी करत होते. अखेर राज्यपालांच्या दौऱ्यामुळे एकदाची या रस्त्याची दुरुस्ती झाली आहे.


Recent Comments