बेळगावातील बीम्स संस्थेच्या रेडिओ डायग्नोसिस विभागातर्फे सोमवारी १२६वा जागतिक रेडिओग्राफर्स दिन पाळण्यात आला.

बीम्स संस्थेच्या रेडिओ डायग्नोसिस विभागातर्फे सोमवारी आयोजित १२६वा जागतिक रेडिओग्राफर्स दिनाचे उदघाटन मान्यवरांनी केक कापून केले. फ्लो
यावेळी बोलताना रेडिओ डायग्नोसिस विभागाचे प्रमुख इरण्णा पल्लेद यांनी जागतिक रेडिओग्राफर्स दिनाबाबत माहिती देऊन जागतिक रेडिओग्राफी क्षेत्राला सर विल्यम रॅन्डनर यांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. यावेळी बोलताना बीम्सचे संचालक डॉ. आर. जी. विवेकी यांनी रेडिओ डायग्नोसिस विभागाच्या कार्याची प्रशंसा केली. रोगनिदानामुळेच उपचारांत अचूकता येते आणि रोगनिदानासाठी रेडिओग्राफीचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अचूक रोगनिदान होण्यासाठी कष्ट घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मेडिकल सुपरिण्टेण्डेण्ट डॉ. ए. बी. पाटील, जिल्हा सर्जन आर. सी. सुधाकर आदी उपस्थित होते.


Recent Comments