हुक्केरी तालुक्यातील ४७२ अंगणवाडी केंद्रे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण अधिकारी मंजुनाथ परसन्नवर यांनी दिली आहे.

आज हुक्केरी तालुक्यातील गुडस गावात अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला आणि बालकल्याण अधिकारी मंजुनाथ परसन्नवर म्हणाले, सरकारच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यात आली असून मुलांना पूर्व-शालेय शिक्षण आणि अभ्यासक्रमेतर उपक्रम देण्यात येणार आहेत. 
ग्रामपंचायत अध्यक्ष आप्पाना खातेदार आपल्या भाषणात म्हणाले, गावातील दोन अंगणवाडी केंद्रामध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.
अंगणवाडी विभाग अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मुलांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर सरस्वती पूजनाने शालेय कामकाजाला सुरुवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आज पुन्हा सुरु झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे रूपा दोडगन्नावर नामक पालकाने सांगितले.
यावेळी सीडीपीओ मंजुनाथ परसन्नवर, पर्यवेक्षक यल्लाप्पा मुक्कण्णावर, पीडीइ. अविनाश होळेप्पगोळ, सुप्रित चंदरगी, कुमार पात्रोट, शैला नेरली, अरुण नेरली, शिक्षिका गोदावरी राजापुरे, जयश्री दुरदूंडी, केंमाना पाटील, कृष्णम्मा पत्तार आणि पालक उपस्थित होते.


Recent Comments