बेळगाव शहरातील प्रसिद्ध सराफी पेढी पोतदार ब्रदर्स ज्वेलर्सवर आणि मालकांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर खात्याने सोमवारी छापेमारी केली. होय, बेळगाव शहरातील प्रसिद्ध सराफी पेढी पोतदार ब्रदर्स ज्वेलर्सच्या पाठीमागे आता इन्कम टॅक्स विभागाचे शुक्लकाष्ठ लागले आहे. सोमवारी इन्कम टॅक्स खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने खडेबाजारातील पोतदार ब्रदर्स ज्वेलर्स पेढीवर तसेच मालक अनिल पोतदार यांच्या जाधवनगरातील निवासस्थानावर छापे टाकले.

इन्कम टॅक्सच्या या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढला आहे. बेळगाव शहरापाठोपाठच जिल्ह्यातील गोकाक शहरातही प्राप्तिकर खात्याने छापे टाकले. गोकाकमधील बाफना ज्वेलर्स या प्रसिद्ध सराफी पेढीवर आणि मालक विजय बाफना यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. पोलीस बंदोबस्तात छापे टाकून इन्कम टॅक्स खात्याच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. सराफी व्यावसायिकांना लक्ष्य करून हे छापे टाकण्यात आले.


Recent Comments