Hukkeri

राष्ट्रीय शिक्षण धोरणावर हुक्केरीत कार्यशाळेचे आयोजन

Share

हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावातील व्ही. एम. कत्ती महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण नियोजन आणि अंमलबजावणी या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि उद्योजक पवन कत्ती यांनी दिली.

व्हॉइस : हुक्केरी येथील गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरण जारी करण्यासंदर्भात पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांसाठी बेल्लद बागेवाडी येथील व्ही. एम. कत्ती महाविद्यालयात बुधवार दिनांक १० रोजी सकाळी १० पासून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात चर्चा करण्यात येत असून सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन कत्ती यांनी केले.

यानंतर व्ही. एम. कत्ती महाविद्यायाचे प्राचार्य व्ही. एस. हुगार हे बोलताना म्हणाले, महांतेश्वर विद्या ट्रस्ट आणि व्ही एम कत्ती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते होणार आहे.

यावेळी हुक्केरी अक्षर दासोह संचालक श्रीशैल हिरेमठ, ए. पी. एम. सी. संचालक प्रशांत पाटील, के. सी. मुचंडी, विनायक नाईक, बसवप्रभू आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: