Hukkeri

हुक्केरीत कर्मचारी निवासी संकुलाच्या कामाला प्रारंभ

Share

हुक्केरी सार्वजनिक इस्पितळाच्या कर्मचारी निवासी संकुलाच्या कामाला वन अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते चालना देण्यात आली.

हुक्केरी शहरातील सरकारी इस्पितळाच्या आवारात बांधण्यात येणार असलेल्या कर्मचारी निवासी संकुलाची पायाभरणी मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, हुक्केरी व संकेश्वरातील सरकारी इस्पितळे सुसज्ज आहेत. मात्र कर्मचारी निवासस्थाने गैरसोयीची ठरत असल्याने नवी निवासस्थाने बांधण्याचे ठरवून या कामाला सुरवात केली आहे. या ठिकाणी डॉक्टर्स, नर्स आणि ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.

याप्रसंगी अपर जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. एस. गडद, वैद्याधिकारी डॉ. उदय कुडची, मुख्य वैद्याधिकारी डॉ. महांतेश नरसन्नवर, डॉ. आर. ए. मकानदार, नगराध्यक्ष ए. के. पाटील आदी उपस्थित होते.

 

Tags: