Khanapur

नंदगड येथे तरुण मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Share

वाचनासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी खेळही आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी खेळांमध्येही भाग घ्यावा असे आवाहन खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी केले.

खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तरुण मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. पूजा करून त्याचे उदघाटन केल्यावर बोलताना तहसीलदार रेश्मा तालिकोटी म्हणाल्या, आपल्या विकासासाठी वाचन जितके आवश्यक आहे तितकाच क्रीडाप्रकारातील सहभागही महत्वाचा आहे. खेळात हरणे किंवा जिंकणे हे महत्वाचे नसून, त्यात सहभाग घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे युवकांनी वाचनासोबतच खेळांतही भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट यावेळी तरुण मंडळाचे अध्यक्ष पी. के. पाटील, नागेंद्र पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, कबड्डीप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: