Kagawad

ऐनापुरात समुदाय भवनाचे उदघाटन

Share

 कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील डोंगरावरील महालक्ष्मी देवस्थानच्या समुदाय भवनाचे उदघाटन आणि वास्तुशांती कार्यक्रम गुरुदेवाश्रमाचे बसवेश्वर महास्वामीजी आणि मदभावी शनेश्वर मंदिराचे एस. प्रवीणशास्त्री हिरेमठ यांच्या पौराहित्याखाली पार पडला

भक्तांनी दिलेल्या देणगी आणि समाजकल्याण खात्याचे अनुदान अशा सुमारे ५० लाख रु निधीतून ऐनापूर येथील डोंगरावरील श्री महालक्ष्मी देवस्थानच्या समुदाय भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. रविवारी त्याचा उदघाटन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना ऐनापूर येथील गुरुदेवाश्रमाचे बसवेश्वर महास्वामीजी म्हणाले, देवस्थान हे देवाची भक्ती करण्याचे पवित्र स्थान आहे. येथे आल्यावर संसारातील ताण-तणाव विसरून देवाशी एकरूप होऊन त्याची भक्ती केली पाहिजे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या परिसरात झाडे लावून निसर्गाचे रक्षण करण्यास स्वच्छता राखून मंदिर परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.

सामाजिक कार्यकर्ते महावीर पडनाड म्हणाले, जन्माला आल्यावर प्रत्येकजण आपापल्या परीने कष्ट करून पैसे, संपत्ती कमावतो. कमावलेल्या संपत्तीतील थोडा तरी भाग समाजाला दिला पाहिजे. त्यामुळे मिळणारे समाधान अन्य कष्ट मिळत नाही.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. राजू कागे, उद्योजक विनोद सावडकर, प्रवीण गानिगेर, संजय कुचनुरे, कुमार अपराज, आदिनाथ दन्नोल्ली, विरुपाक्ष डुगणावर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: