Belagavi

हिंदवाडीतील लिंगायत स्मशानभूमीजवळ आढळला मृतदेह

Share

बेळगावातील हिंदवाडीतील लिंगायत स्मशानभूमीजवळ सडलेल्या अवस्थेतील एक मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तो मृतदेह जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून देण्यात आला.

एका अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदर्भ शनिवारी सकाळी हिंदवाडीतील लिंगायत स्मशानभूमीजवळ आढळून आला. या मृतदेहामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ‘हेल्प फॉर निडी’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून टिळकवाडी पोलिसांना कळविले. टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून दिला.

या प्रकरणी टिळकवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.  दरम्यान, यासंदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना ‘हेल्प फॉर निडी’चे सुरेंद्र अनगोळकर म्हणाले, हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमीजवळ अज्ञाताचा मृतदेह आढळून आला आहे. हे स्मशान बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे असले तरी पालिकेकडून तेथे स्वच्छता, सुधारणा केली जात नाही. त्यामुळे येथे अव्यवस्था आहे. किमान यापुढे तरी पालिकेने याठिकाणी स्वच्छता राखावी अशी मागणी केली.  यावेळी श्रीकांत कुऱ्याळकर, भरत नागरोळी, अभिषेक पुजारी, अमर कोलकार, हर्ष चव्हाण आदी उपस्थित होते.

 

Tags: