Hukkeri

वनमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक वन कार्यालयाचे उद्घाटन

Share

हुक्केरी शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रादेशिक विभागाच्या वन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा वनमंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आला. हुक्केरी तालुका पंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वृक्षारोपण करून वनमंत्री उमेश कत्ती यांनी उद्घाटन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत वनाधिकारी महांतेश सज्जन यांनी नेले. व्यासपीठावर बेळगावचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी विजयकुमार सालीमठ, उपवनसंरक्षणाधिकारी जी. पी. हर्षभानू, सहाय्यक वन वनसंरक्षणाधिकारी एम. बी. कुसनाळ, इ ओ उमेश सिदनाळ, कर्मचारी संघाचे अध्यक्ष महांतेश नाईक, नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, जयगौडा पाटील, विद्युत सहकारी संघाचे अध्यक्ष के. बी. पाटील, मारुती अष्टगी आदी उपस्थित होते.

हुक्केरी येथील नव्या कार्यालयात आलेल्या वनाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि हुक्केरी तालुका सरकारी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांचे स्वागत केले. सदर कार्यालयाच्या स्थापनेसाठी परिश्रम निलाप्पा कोळी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून हुक्केरी येथे वनविभागाचे कार्यालय करण्यात यावे, अशी येथील नागरिकांनी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून याठिकाणी सदर कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे ते म्हणाले.

यावेळी वनविभागाचे अधिकारी लक्ष्मण वाळद, शिवकुमार नाईक, एस. एस. कोरी, गजानन पाटील, भाजप अध्यक्ष राचय्या हिरेमठ, यमकनमर्डी भाजप अल्पसंख्यांक घटकचे अध्यक्ष मोशीन इनामदार, रमेश कुलकर्णी आणि विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: