Belagavi

बेळगावात रविवारी गडी कन्नड सांस्कृतिक उत्सव

Share

कर्नाटक राजोत्सवानिमित्त उद्या, रविवारी बेळगावातील शिवबसवनगरातील एस. जी. बाळेकुंद्री सभागृहात गडी कन्नड सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले आहे.

शनिवारी कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्रीरंग जोशी यांनी ही  माहिती दिली. जोशी म्हणाले, कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरण आणि सप्तस्वर संगीत कला बळगतर्फे आयोजित सांस्कृतिक उत्सवात काव्यमैफल, चर्चासत्रे होणार आहेत. साहित्यिक अप्पासाहेब अलिबादी अध्यक्षस्थानी असतील. खा. मंगल अंगडी, केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.  त्यानंतर सुरेश वाघमोडे यांनी सांगितले की, रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ व. पर्यंत विविध कन्न्डपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यावेळी सप्तस्वर संगीत कला बळगच्या अध्यक्षा वीणा किडदाळ, हजरत मुल्ला, मल्लिकार्जुन नायक आदी उपस्थित होते.

 

Tags: