महाराष्ट्राचे आणि मराठ्यांचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास आजही अंगावर रोमांच उठवणारा आहे. प्रत्येकाच्या मनामनात आणि नसानसात भिनलेला असा शिवरायांचा इतिहास आजही आपल्या अलौकिक शक्तीचा आभास घडवतो. दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी बालचमू आणि तरुणांच्यावतीने छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. बेळगावमध्ये प्रत्येक गल्लोगल्ली साजऱ्या होणाऱ्या या सणासंदर्भात इन न्यूजने घेतलेला आढावा पाहुयात….

प्रत्येक हिंदू बांधवांच्या नसानसात भिनलेले शिवराय आणि त्यांची तत्वे आबालवृद्धांमध्ये आपसूक भिनली आहेत. छत्रपतींच्या शौर्याची, धैर्याची गाथा आजही तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रत्येकाच्या हृदयात आणि ओठावर रुळली आहे. या अलौकिक अशा इतिहासाचा अविस्मरणीय अनुभव सध्या बेळगावकर अनुभवत आहेत. बेळगाव शहरासह तालुक्यात प्रत्येक गल्लोगल्ली छत्रपतींच्या गड – किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. सध्या बालचमू आणि युवक या गड किल्ल्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. दिवाळी सणानिमित्त साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमात अनेक युवक मंडळांचाही मोठा सहभाग असतो.
बेळगाव तालुक्यातील तुरमुरी या गावातील शिवतेज आणि स्वराज युवक मंडळासह अनेक युवक मंडळाने शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या अप्रतिम कलाकृती साकारल्या आहेत. शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे गड किल्ले पाहून आजही अंगावर रोमांच उभे राहतात. (फ्लो)
यासंदर्भात शिवतेज युवक मंडळाच्या सदस्यांनी आमच्या इन न्यूजशी केलेली बातचीत आणि किल्ल्यासंदर्भात दिलेली माहिती आपण पाहुयात…
गेल्या ५ वर्षांपासून अशापद्धतीने गड किल्ल्यांची प्रतिमा साकारण्यात येत असून शिवकालीन इतिहास, गड किल्ल्यांची रचना आणि शिवकालीन प्रशासनासंदर्भात मंडळाच्या सदस्याने दिलेली माहिती जाणून घेयात…
छत्रपतींच्या आदर्श विचाराने सारेच जण आजही प्रभावित आहेत. हिंदू संस्कृतीत आराध्यदैवत म्हणून पुजल्या जाणाऱ्या छत्रपतींच्या गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारत त्यांच्या आदर्शांची आणि तत्वांची देखील उपासना करणे आणि अंगीकार करणे हेही महत्वाचे आहे.
कॅमेरामन सुभानी सह राघवेंद्र सरदेसाई, इन न्यूज, बेळगाव


Recent Comments