Chikkodi

येडूरमध्ये कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन

Share

चिकोडी तालुक्यातील येडूर गावात कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरुष आणि महिला संघाच्या मुक्त कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चिंचली येथील महाकाळी आणि कोल्हापूर येथील शिवमुद्रा स्पोर्ट्स संघाने बाजी मारली.

येडूर येथील शिवतेज फेडरेशनच्या वतीने कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या औचित्याने भव्य महिला आणि पुरुष गटाच्या मुक्त कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कर्नाटकातील म्हैसूर, दावणगेरे, हुबळी, बेंगळुरू, आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर सांगली सह विविध भागातील ६९ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण चिकोडी आमदार अण्णासाहेब जोल्ले, आणि त्यांचे सुपुत्र बसवप्रसाद जोल्ले यांनी केले.

यावेळी चिकोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी शिवतेज फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

सदर स्पर्धा अंतिम टप्प्यात रोमांचक ठरली. पुरुष गटात कोल्हापूर येथील शिवमुद्रा स्पोर्ट्स आणि मळवाड शिवाजी स्पोर्ट्स या संघामध्ये कोल्हापूर येथील शिवमुद्रा स्पोर्ट्सने बाजी मारली. तर महिला संघात चिंचली येथील महाकाळी संघ आणि मळवाड येथील शिवाजी स्पोर्ट्स या संघामध्ये झालेल्या अंतिम फेरीत चिंचली येथील महाकाळी संघ विजयी ठरला. विजेत्या स्पर्धक संघांना २५०००, १५००० आणि ५००० असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यासंदर्भात शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक अजय सूर्यवंशी आणि सहसंस्थापक अमर बोरगावे यांनी सदर स्पर्धांबद्दल माहिती दिली.

यावेळी आप्पासाहेब जोल्ले, अमर यादव, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, भिकाजी पाटील, मनोज किचडे, दिलीप पवार, संजय नांद्रे, अण्णाप्पा बोरगावे, मनोहर बोरगावे, सुशांत लंबुगोळ आदी उपस्थित होते.

Tags: