Belagavi

सागर बी.एड. कॉलेजचा निकाल १०० टक्के

Share

बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या २०२०२१च्या बी.एड. अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात बेळगावच्या एसबीजी शिक्षण संस्थेच्या सागर बी.एड. कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.

होय, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या २०२०-२१च्या बी.एड. अंतिम वर्ष परीक्षेच्या निकालात सागर बी.एड. कॉलेजने १००% निकालासह चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय या कॉलेजच्या ७६ विध्यार्थ्यानी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे. धनश्री गाडे या विद्यार्थिनीने ९०% गन मिळवून कॉलेजमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे. पूजा इरकल हिने ८९.७% गुणांसह द्वितीय, तर सुनयना नायक हिने ८८.७ तृतीय क्रमांक पटकावला आहे. १४ विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल एसबीजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक, कार्याध्यक्ष, सागर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Tags: