Belagavi

वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्या : आ. सतीश जारकीहोळी

Share

ग्राहकांना वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही याची दक्षता हेस्कॉम अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी केली.

यमकनमर्डी मतदारसंघातील कर्नाटक औद्योगिक वसाहत विकास महामंडळाच्या वसाहतीअंतर्गत यमनापूर गावातील हेस्कॉम कार्यालयातर्फे काकती-होनगा परिसरासाठी २४ तास सेवा देणाऱ्या फिरत्या वाहनसेवेचे उदघाटन आ. सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आले. 

यावेळी जारकीहोळी यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांशी वीजपुरवठ्यासंदर्भात चर्चा करून केंद्रांतर्गत वीज पुरवठा करण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीना आणि गावांना पुरेशा दाबाने आणि विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्ती फिरत्या वाहनसेवेमुळे करून देण्यात येणार असल्याने ग्राहकांचीही सोय होणार आहे. दुरुस्ती करून तातडीने वीजपुरवठा मिळवण्यात त्यांना मदत होणार असल्याने ग्राहकांनीही याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट यावेळी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता अप्पन्नावर, सहायक कार्यकारी अभियंता व्ही. जी. नायक, सिद्धू सुनगार, सुनील सुनगार, रामण्णा गुळ्ळी, पांडू मन्नीकेरी, सुरेश नाईक, काकतीचे सीपीआय आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: