हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री, बस्तवाड, गौडवाड, यरगट्टी, यरनाळ या गावातील कर्मचाऱ्यांना चिकोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यावतीने देण्यात आलेले आहार किटचे माजी मंत्री शशिकांत नाईक यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. गावातील प्राथमिक कृषी सहकारी संघामध्ये सदर किट्स वितरित करण्यात आली.

आहार किटचे वितरण करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत नाईक म्हणाले, गेल्या ३ वर्षांपासून हिरण्यकेशी नदीतीरावरील नागरिक अतिवृष्टीचा सामना करीत आहेत. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने गरजूंना आहार किटचे वितरण करण्यात येत आहे, हि बाब कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
यावेळी गौडवाड, बदकुंद्री, यरनाळ, यरगट्टी गावातील हजारो जणांना आहार किटचे वितरण करण्यात आले. बस्तवाड ग्रामपंचायत सदस्य बसय्या पुजेरी आणि गौडवाड कृषी पट्टीने सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश कोटबागी बोलताना म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी पूरग्रस्तांना आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी वितरित केलेले आहार किट्स याचे आम्ही बस्तवाड, गौडवाड ग्रामस्थांच्यावतीने आभार मानतो. आम्हाला मंत्री उमेश कत्ती आणि माजी मंत्री शशिकांत नाईक यांचेही सहकार्य लाभले आहे, यामुळे यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिदगौडा, राजू पाटील, काडाप्पा मगदूम, बसवराज नांदगावी, जांगिरबेग इनामदार, धर्मेंद्र गस्ती, बालिश पडेप्पागोळ, शिडगौडा देसाई, कुमार मगदूम, विनायक वंटमुरी, शंकर तिप्पनाईक, परगौडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत,सहकारी संघाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments