Belagavi

आमदार सतीश जारकीहोळींच्या हस्ते यमकनमर्डी मतदार संघात विविध विकासकामांना प्रारंभ

Share

यमकनमर्डी मतदार संघातील विविध विकासकामांना केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला.

बुधवारी मुचंडी गावातील सरकारी कन्नड, मराठी शाळांना ९० लाख रुपयांच्या अनुदानातून मूलभूत सुविधा तसेच ९० लाख रुपये खर्चातून फुटपाथ आणि गटारी निर्मिती कामकाजाला आमदार सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते भूमिपूजनाने सुरुवात करण्यात आली. यानंतर गावातील स्टुडंट फेडरेशन सिद्धारूढ कन्नड हायस्कुलमधील मैदान निर्मितीचेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी भूमिपूजन केले. या मैदानावर चिकोडी, बेळगाव शैक्षणिक जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षकांचा समावेश करण्यात यावा, आंतरराज्य कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन सतीश जारकीहोळी यांना करण्यात आले. सदर आवाहनाचा विचार करून यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिले.

यानंतर आष्टे आणि चंदगड गावातील ६० रुपये खर्चातून निर्माण करण्यात येत असलेल्या गटारी निर्माण, कन्नड शाळा वर्ग, हुदली बायपास मार्ग या कामकाजही आमदार सतीश जारकीहोळी यांनी चालना दिली. अद्याप चंदगड आणि मुचंडी गावातील हायस्कुलमध्ये रनिंग ट्रक निर्माण करणे, मुचंडी कन्नड, मराठी शाळेजवळ फुटपाथ निर्मिती कामकाजही प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी गावातील रोजगार हमी, वॉटर टॅंक सह इतर समस्या सोडविण्याची गवाही दिली. आगामी काळात अधिकाधिक विकासकामे करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीवकुमार हुलकाई, सुभाष नाईक, मुकुंद वाळवेकर, कंत्राटदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: