दलित समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी भाजपमध्ये सामील झाला आहे, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केले होते. याविरोधात आज विजापूरमध्ये भाजप एससी मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सदर विधानाचा विरोध करत विजापूर शहरातील गांधी चौकात भाजप एससी मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात दलित समाजासंदर्भात सिध्दरामय्यांनी अपमानास्पद विधान केले असून सिद्धरामय्या यांची राजकीय कारकीर्द बरबाद व्हावी, सिद्धरामय्या यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावे, अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात विजापूर जिल्हा एससी घटकचे जिल्हाध्यक्ष गोपाल घटकांबळे यांनी सिध्दरामय्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सिध्दरामय्यांनी दलित समाजाची माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात भाजप नेते विजूगौडा पाटील, चंद्रशेखर कवटगी, प्रकाश अक्कलकोट, मळुगौड पाटील.जगदीश मुचंडी, कांतु शिंदे, राजू हुन्नूर, रमेश देवकर आणि प्रवक्ते विजय जोशी यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments