गोरगरीब अल्पसंख्यांकांना कसलाही त्रास होऊ न देता, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा कर्नाटक राज्य अल्पसंख्यांक निगमचे अध्यक्ष मुक्तार पठाण यांनी दिला. 

कर्नाटक राज्य अल्पसंख्यांक निगमच्या बेळगाव शाखेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा निगमच्या अध्यक्ष मुक्तार पठाण यांनी बुधवारी बैठकीत घेतला. यावेळी विविध अल्पसंख्यांक कल्याण योजनांवर चर्चा करण्यात आली. सरकारी योजनांचा लाभ घेताना अल्पसंख्यांकांना कसलाही त्रास होऊ नये, त्यांना धावपळ करावी लागू नये, त्यांना वेळेत योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यात हयगय केल्यास संबंधितांवर मुलाहिजा न ठेवता कारवाई करण्यात येईल असा इशारा निगमचे अध्यक्ष मुक्तार पठाण यांनी दिला. रजिस्टर ठेवण्यात येत नसल्याची तक्रार सगळीकडे ऐकू येत आहे. जुन्या चुका टाळा. त्यांची पुनरावृती न करता अल्पसंख्यांकांचा विकास साधा असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
बैठकीला राज्य अल्पसंख्यांक निगमचे व्यवस्थापक महंमद नजीर, सिराजुद्दीन आणि प्रशासकीय अधिकारी अंजुम हाफिज आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments