कागवाड तालुक्यातील ऐनापूर परिसरातील सरकारी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २४ लाख रुपयांच्या खर्चातून, नाबार्ड योजनेंतर्गत आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन केआरईएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दडगौड पाटील यांच्याहस्ते पार पडले.

मंगळवारी ऐनापूर येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्यांचे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या युनिटचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्यांची मागणी आमदार श्रीमंत पाटील यांच्याकडे करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून नाबार्ड योजनेंतर्गत २४ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. स्थानिक उर्दू शाळा शिक्षकांसह कंत्राटदार कुमार गाडीवड्डर यांनी या वर्गखोल्यांची निर्मिती करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
सदर शाळेत पहिली ते आठवी पर्यंत एकूण १३६ विद्यार्थी शिक्षण घेत असून विभागातर्फे सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याची माहिती मुख्याध्यापक वाय बी मुल्ला यांनी दिली.
यावेळी पीकेपीएस अध्यक्ष कुमार अपराज, संचालक राजेंद्र पोतदार, प्रवीण गणगेर, अरुण गणगेर, संजीव भिरडी, दादा जतेन्नावर, तम्मण्णा पार्षट्टी, प्रकाश चीनगी, रमेश नाईक, जावेद डांगे, अल्ताफ मुल्ला, मुसा सय्यद, गुरुराज मडीवाळर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments