बेळगावातील स्वस्तिक फौंडेशनतर्फे कर्नाटक राज्योत्सवानिमित्त चन्नम्मा चौकाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

सोमवारी १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवानिमित्त चन्नम्मा चौकात गर्दी झाली होती. यावेळी लोकांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी स्वस्तिक फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री चौकात सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले. याशिवाय जवळपासच्या शहर बसथांब्यांचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कार्याबद्दल स्वस्तिक फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे लोकांनी कौतुक केले. 


Recent Comments