Khanapur

धमकी दिल्याप्रकरणी लोंढा आरएफओ विरोधात कारवाई करण्याची मागणी

Share

खानापूर तालुक्यातील लोंढा येथील आरएफओ प्रशांत गौराणी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी केला आहे.

यासंदर्भात खानापूर शहरातील सरकार गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

शनिवारी गावातील सरकारी कामासाठी आपल्याला लोंढा आरएफओ बोलावत असल्याचे सांगण्यात आले. बराच आरएफओ यांनी नीटपणे उत्तर दिले नाही. एकदा आपल्याला प्रतिसाद मिळाला परंतु समोरून एकवचनी आणि उद्धटपणे उत्तर दिले. यानंतर लगेच रविवारी काही फॉरेस्ट गार्डस आपल्या घरी येऊन आपल्याला कार्यालयात आरएफओनी बोलाविल्याचे सांगण्यात आले. आणि यावेळी आरएफओ नि जीवे मारण्याची धमकी दिली असून याचा आपल्याला मानसिक त्रास झाला असल्याचे बाबुराव देसाई यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कचेरी यांनी तालुका विभागाच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करत खानापूर पोलीस स्थानकावर लोंढा आर एफ ओ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेला कर्नाटक अरण्य विकास निगमचे संचालक सुरेश देसाई, भाजप तालुका मंडळाचे अध्यक्ष संजय कुबल, विठ्ठल हलगेकर, बसवराज सानिकोप्प, चैतन मणेरीकर यांच्यासह इतरांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. या बैठकीला भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: