हुक्केरी येथे ६६ व्या कर्नाटक राज्योत्सव दिनाचे साधेपणात आचरण करण्यात आले. शहरातील एस. के. हायस्कुलच्या मैदानात तालुका प्रशासनाच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिरेमठ चंद्रशेखर महास्वामी उपस्थित होते.

तालुका दंडाधिकारी डॉ. डी. एच. हुगार यांच्याहस्ते भुवनेश्वरी प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत गायिले. व्यासपीठावर तालुका पंचायत इओ सी पी आर रमेश छायागोळ, इओ उमेश सिदनाळ, नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, सदस्य महावीर निलजगी, उदय हुक्केरी, सिद्दप्पा हलीजोळ, आयरिश कुलकर्णी, मधू करनिंग, सीडीपीओ मंजुनाथ परसन्नवर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत सहभाग घेतला. 
यानंतर गीत गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले हिरेमठ चंद्रशेखर महास्वामी यांनी कन्नड भाषा, आणि कर्नाटक राज्योत्सवासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.
(बाईट)???
या कार्यक्रमाला अधिकारी टी. ए. नांदणी, व्ही. आर. नांगनूर, श्रीशैल हिरेमठ, नगरपालिका मुख्याधिकारी मोहन जाधव, बी. सी. एम. अधिकारी महांतेश उरवळगिन, सरकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष महांतेश नाईक, ए. डी. एल आर. शशिकांत हेगडे, बसवराज नांदेकर यांच्यासह कन्नड भाषिक आणि अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments