कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा विभागाच्या, सरकारच्या विविध ऑनलाईन सेवांचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते करण्यात आले.

बंगळूरमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जनस्पंदन – सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली, १९०२ हेल्पलाईन, मोबाईल ऍप आणि वेब पोर्टल तसेच परिवहन विभागाच्या ३० संपर्करहित ऑनलाईन सेवांचे अनावरण केले. 
ऑनलाईन सेवांचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या पोलीस पथसंचलनात सुधारणा होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पथसंचलनादरम्यान देण्यात येणाऱ्या घोषणा या कन्नडमध्ये देण्यात याव्यात, यासंदर्भात चिंतन करण्यात येत आहे. याबाबत यापूर्वीही प्रयोग झाले असून ते राज्यभर लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण, बी. सी. नागेश, आमदार सुरेशकुमार, महांतेश कवटगीमठ, रिझवान अर्शद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments