Khanapur

खानापुरात राज्योत्सवानिमित्त महापुरुषांना अभिवादन

Share

खानापूर तालुका प्रशासनाच्या वतीने सोमवारी ६६ वा कर्नाटक राज्योत्सव दिन साधेपणाने परंतु अर्थपूर्णरीत्या साजरा करण्यात आला.

खानापूर शहरातील चारही दिशांना असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मिकी आणि जगज्योती बसवेश्वर या महापुरुषांच्या पुतळ्यांना तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अभिनेते पुनीत राजकुमार याना २ मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी आणि तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

 

Tags: