Banglore

अशोक चंदरगी यांचा विधानसौध येथे सत्कार

Share

बेंगळूर येथील विधानसभेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक राज्योत्सवात बेळगावचे कन्नड आंदोलक आणि कन्नड समितीचे अशोक चंदरगी आणि टोकियो ऑलिंपिक कोच सुहास लालीनकेरे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य विधान मंडळाच्या वतीने आज विधानसौध च्या बँक्वेट हॉल मध्ये कर्नाटक राज्योत्सव कार्य्रक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या इतिहासात सर्वप्रथम बेळगाव जिल्हा कन्नड संघटनेच्या क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी आणि टोकियो ऑलिम्पिक कोच तसेच उत्तर प्रदेशातील नोयडाचे जिल्हाधिकारी सुहास लालीनकेरे यतिराज यांचा विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी आणि विधान सभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर कंबार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनीही उपस्थिती लावली होती.

Tags: