कन्नड राज्यरत्न, पॉवर स्टार, कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनामुळे बेळगावमध्येही अत्यंत साधेपणात राज्योत्सवाचे आचरण करण्यात आले. विविध कन्नड संघटनांच्या वतीने बेळगावमधील राणी चन्नम्मा चौक येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

व्हॉइस : सोमवारी राणी चन्नम्मा चौकात चन्नम्मांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुडलसंगमचे बसवजय मृत्युंजय स्वामी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांच्यासह विविध कन्नड संघटनांचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी लाल पिवळ्या रंगाचे फुगे आकाशात उडवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
कार्यक्रमाची सुरुवात सिनेअभितेने पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. पुनीत राजकुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. यावेळी बसवजय मृत्युंजय स्वामी बोलताना म्हणाले, १ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार राज्योत्सव यंदा साधेपणात आचरणात आणण्यात येत आहे. पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. पुनीत राजकुमार यांना कर्नाटक रत्न प्रशस्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा आग्रह सरकारकडे स्वामीजींनी केलाय
यानंतर चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कर्नाटक राज्योत्सव पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे यंदा अत्यंत साधेपणात आचरणात आणण्यात येत असून आपल्या वडिलांनंतर नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध सुपरस्टारच्या आत्म्याला ईश्वरचरणी शांतता लाभो, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामी यांच्यासह विविध कन्नड संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि कन्नड भाषिक उपस्थित होते.


Recent Comments