Belagavi

एम के हुबळीत कर्नाटक राज्योत्सव साजरा

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम. के हुबळी शहरात कर्नाटक राज्योत्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एम के हुबळी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या कन्नडम्मा मूर्तीला पुष्पहार अर्पण करून राज्योत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी एम के हुबळी येथे समाजसेवक हबीब शिलेदार यांनी मिठाई आणि पाण्याच्या बाटलीचे वितरण केले.

यावेळी बोलताना हबीब शिलेदार म्हणाले, भुवनेश्वरी देवीच्या या उत्सवात सामील होताना मला आनंद होत आहे. पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

या कार्यक्रमाला कन्नड भाषिक संघटना, कन्नड भाषिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags: