Chikkodi

चिकोडी येथे ६६ व्या राज्योत्सवाचे आचरण; आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते भुवनेश्वरी प्रतिमेचे पूजन

Share

चिकोडी येथे ६६वा कर्नाटक राज्योत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते भुवनेश्वरी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपविभागाधिकारी शशिधर बगली यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

चिकोडी विभागातील आर. डी. हायस्कुल येथे ६६ व्या राज्योत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बीईओ बी. ए. मेकनमर्डी यांनी उपस्थितांचे स्वागत केले . यावेळी आमदार गणेश हुक्केरी यांनी कर्नाटक राज्य, कन्नड भाषा यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे सदर कार्यक्रम साधेपणात साजरा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

यानंतर उपविभागाधिकारी शशिधर बगली बोलताना म्हणाले, कर्नाटक राज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय प्रगती केली आहे. तसेच कोरोना निवारणासाठी संपूर्ण जगात भारताने आदर्श घालून दिला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पीएचडी प्राप्त तोरनहळ्ळी प्राथमिक शाळेचे शिक्षण नागेश दिंडीगट्टी तसेच शिक्षक राकेश जाधव आणि संकपाळ यांचा तालुका प्रशासनाच्या वतीने आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसीलदार एन. बी. गेज्जी, नगरपालिका उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, एडीएचओ डॉ. एस. एस. गडेद, प्राचार्य मोहन जिरग्याळ, चंद्रकांत हुक्केरी, डॉ. विठ्ठल शिंदे, सीपीआर आर. आर. पाटील, सीडीपीओ दीपा काळे, पीएसआय यमनाप्पा मांग, अरविंद घटती, मंजुनाथ जनमट्टी, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी, नरेंद्र नेर्लीकर, साबीर जमादार, संजू बडिगेर, नागेश माळी, कृष्ण केंचप्पन्नावर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.ए. बी. सोलापुरे यांनी आभार मानले. प्रभारी डीडीपीआय ए. सी. गंगाधर यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: