Khanapur

पुनीत राजकुमार याना नंदगडमध्ये श्रद्धांजली

Share

 खानापूर तालुक्यातील नंदगड येथे नाडहब्बा उत्सव समितीतर्फे कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार याना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नाडहब्बा उत्सव समितीतर्फे नंदगड येथे आयोजित शोकसभेत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष शंकर सोंनोळ्ळी म्हणाले, अप्पू हे एक प्रतिभावंत अभिनेते होते. त्यांना समाजाची खूप काळजी होती. त्यांच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे असे सांगितले. याप्रसंगी संतोष किरहलशी, मोरेश्वर मुनवळ्ळी यांच्यासह नाडहब्बा उत्सव समितीचे कार्यकर्ते पुनीत राजकुमार यांचे चाहते उपस्थित होते.

 

 

 

Tags: