Belagavi

निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाला रसिकांकडून मोठा प्रतिसाद

Share

बेळगावातील टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघातील के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत भरविण्यात आलेल्या कोल्हापूरचे चित्रकार एस. निंबाळकर यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाला रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

होय, टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघातील के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत कोल्हापूरचे चित्रकार एस. निंबाळकर व इतर चित्रकारांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. २५ ऑक्टोबरपासून भरविलेल्या या प्रदर्शनाचा उद्या ३१ ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे. या दरम्यान शहर परिसरातील अनेक शाळा-महाविद्यालयांचे विध्यार्थी-शिक्षक, रसिक मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन निसर्गाच्या चित्राविष्काराचा आनंद घेत आहेत. यासंदर्भात आयोजक नितीन कपिलेश्वर यांनी ‘आपली मराठी’ला अधिक माहिती दिली.

चित्रकार कविता चिक्कोडी यांनी सांगितले की, म्हैसूर दसरा महोत्सवात माझ्या चित्रकृतींची विक्री करते. यावेळी प्रथमच बेळगावात माझ्या पेंटिंग्जचे प्रदर्शन भरवले आहे. माझ्या पतीचे मूळ गाव बेळगाव आहे. त्यामुळे २० वर्षानंतर बेळगावला आले आहे. सध्या मी कोल्हापूरच्या चित्रकारांसमवेत काम करत आहे. निसर्गात वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत चित्रकृती रेखाटल्या आहेत. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे असा संदेश त्यातून दिला आहे.

एकंदर मनमोहक चित्रकृतींच्या माध्यमातून निसर्गरक्षणाचा संदेश देण्याचा चित्रकारांचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे असेच म्हणावे लागेल.

 

 

 

Tags: