Belagavi

धर्मादाय व्याख्यान कार्यक्रम पार : बेळगाव जिल्हा लेखिका संघाच्या वतीने आयोजन

Share

बेळगाव जिल्हा लेखिका संघाच्या वतीने धर्मादाय व्याख्यान कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात सरला हेरेकर, सुनंदा मुळे, जयश्री निराकार आणि सुमित्रा मल्लापूर यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे ठेवलेल्या धर्मादाय निधीच्या माध्यमातून सदर धर्मादाय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विजयालक्ष्मी पुट्टी यांनी व्याख्यान दिले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण आयुष्य जगले जाते. दैनंदिन आयुष्यातील अनुभवांवरून माणूस परिपक्व होतो. कन्नड भाषेतील साहित्य इंग्लिश भाषेत आता अनुवादित होत असून साहित्याला पुन्हा चांगले दिवस आले आहेत, असे त्या म्हणाल्या. शिवराम कारंत आणि चंद्रशेखर कंबार अशा दिग्गजांमुळे साहित्य क्षेत्राची भरभराट झाली असल्याचे त्या म्हणाल्या

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका ज्योती बदामी, सुमित्रा मल्लापूर, सुनंदा एम्मी, अक्कमहादेवी हुलगबाळी, सुमा कित्तूर, एम. वाय. मेनसीनकायी, शिवानंद ताल्लुर यांच्यासह इतर साहित्यिक उपस्थित होते.

Tags: