प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांना बेळगावातील चाणक्य युवक मंडळातर्फे शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.

बेळगावातील मठ गल्लीतील जैन युवा वेदिके आणि चाणक्य युवक मंडळातर्फे पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते पुनीत राजकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना मध्वराज वैजन्नावर म्हणाले, पुनीत राजकुमार केवळ एक अभिनेतेच नव्हते तर समाजकार्यातही त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. त्यांच्या निधनाने कर्नाटक पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाने राज्याची न भरून येणारी हानी झाली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चौगुले, संतोष चौगुले, हिराचंद कलमनी, राजेश कलमनी, सिद्धार्थ अमनाजी, अर्जुन चौगुले, अभिषेक चौगुले यांच्यासह वेदिकेचे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments