चिक्कोडी तालुक्यातील उमराणीजवळ दुर्गा मंदिरानजीक कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात शिक्षिका जखमी झाली आहे.

मूळचे कोप्पळ येथील ३८ वर्षीय श्रीनिवास कुमारस्वामी शिल्पी आणि मांजरी (ता. चिक्कोडी) येथील ३८ वर्षीय शिक्षिका अश्विनी अजित तोरसे उमराणीतील सरकारी माध्यमिक शाळेत सेवा जाणतात. गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर ते दुचाकीवरून चिक्कोडीकडे येत होते. त्यावेळी भरधाव स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जखमी झाले श्रीनिवास गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावच्या खासगी इस्पितळात दाखल केले होते. तेथे उपचारांचा उपयोग न होता शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. चिक्कोडी वाहतूक पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments