अकाली निधन झालेल्या कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहणारा फलक अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना विजापुरात शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे.

कन्नड चित्रपट शौकिनांचे लाडके अभिनेते ‘अप्पू’ ‘पॉवर स्टार’ पुनीत राजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या घटनेचा जबर धक्का बसला असून त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विजापुरातही अशाच प्रकारे पुनीत याना श्रद्धांजली वाहून तशा अश्याच एक फलक लावला होता. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा काही अज्ञात समाजकंटकांनी हा फलक जाळून आपल्या विकृतीचे दर्शन घडविले.
विजापुरात आश्रम रस्त्यावरील हायमास्टजवळ ही घटना घडली. दरम्यान, याची माहिती मिळताच पुनीत यांचे असंख्य चाहते त्याठिकाणी जमा झाले. फलक जाळणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करून त्यांनी संताप व्यक्त केला. घटनास्थळी आदर्षनगर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.


Recent Comments